Friday, January 2, 2009

सर तुमच्यासारखे तुम्हीच …

सर तुमच्यासारखे तुम्हीच …

काल परवा एक बातमी कळली आणि दिवसभर मी माझ्या जुन्या आठवनीत गुंतून गेलो ..गावाकडची शाळा…एक सर आमच्या गावत राहायचे…त्यांचा दरारा प्रचंड…सर नुसते गावात फेरी मारायला निघाले तरी आम्ही सगळी मूल घरात लपून बसायचो…मुकुंदराव ननन्दकर असे या सरांचे नाव…या सरानी नुसते शिक्षनच नाही दिले तर आमच्या गावाला एकसंघ बनवल…आमच गाव तस् दोन विचारच…एकाने एक विचार समोर आणला की दूसरा वाकडयात घुसलाच म्हनून समजा…अश्या परिस्थीतीत मुकुंदराव सरानी आमच्या गावात शाळा बांधन्याचे काम सुरु केले..ज्या काळात सरकारकडे पैश्याची चनचन नव्हती त्या कालात मुकुंदराव सरानी स्वताच्या डोक्यावर दगड आणून शालेचे बांधकाम केले…सगळ्या गावकरयाना सोबत घेवून ही शाळा उभी राहिली..प्रभु रामचंद्राने पूल बांधताना खारिनी वालू आणून मदत केल्याची घटना आपण ऐकतोच मात्र सरानी गावातील प्रत्येक माणसाला सोबत घेवून ही शाळा उभारली…शिक्षनाचा नाही तर सम्पूर्ण गावात एक संवादाचा पूल बांधला..असे आमचे सर आमच्यात नसल्याची बातमी वाचली आणि मन सुन्न झाल ...

आता असे शिक्षक पुन्हा होने नाही …आता आम्ही आमच्यातलाच संवाद हरवून बसलोय?विद्यार्थ्यांच्या शिक्षनाकडे आमच लक्षच नाही .संस्काराचा भागच शिल्लक राहिलेला दिसत नाही…आता आदर्श घ्यावा असे शिक्षक कुठे दिसतच नाहीत…पाहाताक्षनी ज्यांच्या पायाकडे हात जावेत असे शिक्षक पहायला मिळत नाहीत… सर तुमच्यासारखे तुम्हीच? सलाम तुम्हाला…

1 comment:

  1. Kharach aajchya yugaat ashyaa shikshakanchi kharach khoop garaj aahe...

    ReplyDelete