आज सकाळी सकाळी पांगुळपुराण यासाठी की दान देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत आजही बलुतेदारी गावात घर करून आहे.दान देता आलंच पाहिजे ते दिल्याने वाढते,असे म्हटले जाते.मोठे मोठे मंदिरे याच गोष्टीचे भांडवल करून मोठे होत आहेत.दान गुप्त असावं अस म्हणतात,तरीही दान करणाऱ्याचे फोटो छापून येतात..काही दान गुप्तपणे होतात मात्र ते हुंडीमधे..मला वाटत पैश्यापेक्षाही श्रद्धेच दान करता आलं पाहिजे.ही श्रद्धा,भाव जपला गेला पाहिजे.दानपेटीपेक्षा मनपेटीमध्ये श्रद्धेची वाढ झाली तर देवळात जाण्याची गरज नाही,माणसात असलेला देव खरच आपल्याला खूप देऊन जातो जेव्हा आपण श्रद्धापूर्वक त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात करतो.. देव दानापेक्षा श्रध्दावानाच्या पदरात गुपचूप टाकून जातो..हीच श्रध्दा,प्रेम माणसावर केले तर?शेवटी देवही आशिर्वादरुपी दानच आपल्या पदरात टाकत असतो..माणसात देव पाहण्याची प्रक्रिया ज्या दिवशी सुरू होईल त्यादिवशी वाढलेले स्तोम कमी होईल..माणसावर श्रद्धापूर्वक प्रेम करा,मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही..ज्या घरात मनःशांती मिळत नाही त्या घरातील माणसे मंदिर शोधायला सुरुवात करतात..घराला मंदिर आणि माणसाला देव मानायला सुरू झाले की नक्कीच प्रेम,आनंद भरभरून व्हायला सुरू होईल
@ संजय जेवरीकर