Tuesday, December 30, 2008

हा ग्लास काठोकाठ भरू दया...

हा ग्लास काठोकाठ भरू दया...

वर्षाची सुरुवात आणि शेवट ॥
चांगल्या कामाने होवू दया..
हा ग्लास असाच आयुष्यभर
काठोकाठ भरू दया..

काही क्षण सुखाचे..
काही आतील दुःखाचे ..
दुखाच्या त्या क्षणाना ..
धीराने परतवून लावू या..?
हा ग्लास असाच आयुष्यभर
काठोकाठ भरू दया..

काही प्रेम करणारे..
काही प्रेमाचे नाटक करणारे..
आपल्याही मनातील प्रेम त्याना कलू दया..
हा ग्लास असाच आयुष्यभर
काठोकाठ भरू दया ..।

आपलेच दात आपलेच ओठ
कधी चुकून चावल तर …
त्यानाही कधीतरी
मनातील भावना समजू दया..
हा ग्लास असाच काठोकाठ भरू दया॥

हँपी न्यू इयर ..
चीअर्स ( पूर्ण भरलेल्या ग्लास सह)

Friday, December 19, 2008

निर्मिती ....

निर्मिती ...

संपत्तीच्या समान वाटपापूर्वी ती आधी निर्माण करावी लागते…
निर्मितिकरता स्वतंत्र बुद्धि आणि स्वयंप्रेरणा आवश्यक असते..
गरज हा लायकीचा पर्याय बनला तर समाजातील कार्यक्षमता नष्ट होईलच

पण सर्वात गरजू ,दुर्बल आणि अकार्यक्षम कोण हे सिद्ध करायची चढाओढ लागेल…
आपल्याला काय साधायचे आहे?
भुकेलेली मानवता जगवन्यासाठी तिला अन्न द्यायच?
की सर्वाना अन्न देण्यासाठी मानवतेचा गला घोटायचा ?

निर्मितीची क्षमता असलेली मंडळी या समाजात खुप आहेत मात्र त्याना योग्य व्यासपीठ मिलताना दिसत नाही…अनेकजन पैश्याअभावी तिथपर्यंत पोहचू शकत नाहित…काहीजन सगळी परिस्थिति चांगली असतानाही काही करताना दिसत नाहीत…अन काही काही जनाची लायकी नसताना मोठी झालेली दिसून येतात ती केवळ पैश्याच्या जोरावर…
या जगात लायकी पैश्यावर मोजण्याची रीत सुरु झाल्यामुले हे सगळे घडू लागले आहेत…काही काही माणसे आजही मेहनतीच्या बलावर अनेक चांगली काम करताना दिसतात …गरज आहे म्हणुन त्या कामात झोकुन देणारी माणसेच ही सगळी प्रक्रिया बिघडवताना दिसतात…
निर्मिती झाली तरच नविन काही तरी घडेल मात्र निर्मिती झालीच नाही तर???
तुम्हाला काय वाटते ??

Thursday, December 18, 2008

एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने …

एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने …

शेजारी कोण राहत या गोष्टीलाही हल्लीच्या जगात फार महत्त्व आले आहे…
सगल्यानी मिळून सोसायटी काढायची आणि पुन्हा एकमेकात भांडणे करत बसायची ही कुठली रित…आता शेजारी नसलेले बरे असे म्हणन्याच्या कालातही क्रिकेटचा शहेंशः सचिन तेंडुलकर याने मात्र शेजारयाना प्रेमाचे पत्र पाठवुन एक धक्काच दिला आहे…सचिन सारखा शेजारी कुठे मिळणार ?मात्र काही काही मोठी माणसेही माणूसघाने असतात…शेजारयाच्या घरातला टी .व्ही.चा आवाजही मोठा झाला तर त्याना जमत नाही…त्यांच कुत्र जोरजोरात ओरडून गल्लिची झोपमोड करत असलेल त्याना चालत ….स्वताच्या अंगाला काहीही लागू न देता समाजाचा विचार करणारी माणसे या जगात खुप आहेत….गणपती उत्सवात जोरजोरात भाषणे द्यायला ही मंडळी पुढे असते मात्र गणपतीची वर्गणी मागायला आलेल्या पोराला नको ते ऐकवत बसतील…सचिन खरच तू ग्रेट आहेस….हल्ली असा शेजारी मिलने फार कठीण आहे…सचिन तू कुठल्या जगात वावरतोयेस …अरे वेड्या, इथे शेजारयाला त्रास व्हावा म्हणुन दारात पडलेली वालू वर्षभर न हालवनारी माणसे आहेत….शेजारयाला पलवुन लावण्यासाठी वाटेल त्याना सुपारया देणारी मंडळी आहे…अश्या जगात तू सगल्याना त्रास होवू नये म्हणुन दिलगीरी मागतोयेस…।

तुझ्या या वागण्याने हम तो फ़िदा हो गये भैय्या…
अब हम भी एक घर बनायेंगे तेरे घर के सामने…

Wednesday, December 17, 2008

अन्नावाचून मरताना….

"आम्ही गेले २५ वर्ष डॉक्टर कार्व्हर यांचे ऋणी आहोत.त्यानी भुइमुगापासून बनवलेल्या दुधान आमच्यावर अनंत उपकार केले आहेत.आफ्रिकेच्या अंतर्गत भागात त्से-त्से माश्या व हिंस्त्र श्वापद यांच्यामुळ दुभती जनावर पालता येत नसत…तेंव्हा मातेच स्तन्य मिळू न शकनाऱ्या नवजात बालकांच्या पोषणाचा यक्ष प्रश्न उभा ठाके…१९१८ साली आम्ही त्याना पत्र पाठवुन अड़चन सांगितली त्यानी भुइमुगापासून दूध कस तयार कराव याची कृति सांगितली..त्यामुले शेकडो बालके वाचू शकले त्यांचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत…”
५ जानेवारी १९४३ रोजी डॉक्टर कार्व्हर यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्याविषयी त्या देशातील नागारिकानी काढलेले हे उदगार आहेत…भुइमुगापासून दूध बनवून एक देश वाचवू शकनाऱ्या समोर खरच नतमस्तक व्हायला पाहिजे…१९४७ साली स्वातंत्र्य मिळालेल्या भारत या प्रगत देशात आजही अनेक बालके अन्नावाचुन किंवा चांगल खाण्यासाठी मिळत नाही म्हणुन कुपोषनाने बळी जातात …आमच्या देशात आजपर्यंत यावर उपाय सांगणारा एक ही नर जन्मला नाही याचे खरे दुखः आहे…रोज कूपोषणाच्या बातम्या ऐकून मन सुन्न होत…
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कार्व्हरने पर्याय देवून त्या देशातील बालकाना जगवल आज आम्हाला स्वातंत्र्य मिळून ६१ वर्ष झाली तरीही आम्हाला कुपोषणावर उपाय सापडू नये यास काय म्हणायचे ?
प्रगत कोण?हा प्रश्न आजही आमच्या समोर आहे .
सलाम कार्व्हर …सलाम … !!!

Tuesday, December 16, 2008

व्हेन सॉरोज कम , दे कम इन बटालियन्स ..

व्हेन सॉरोज कम , दे कम इन बटालियन्स ..
माझा एक मित्र अनेक संघर्षातुनाच आजही उभा आहे…
तो अत्यंत श्रीमंत होता..
कॉलेजला तो जेंव्हा होता तेंव्हा त्याचा पॉकेट मनी १००० रुपये होता आणि आम्हाला महिन्याला ३०० रुपये
मनीऑर्डर यायची…
त्यांचा तांदलाचा बिझनेस होता॥
पुढे काय झाले माहित नाही..वडिल गावाकडे शेती करू लागले तो गायब झाला…
अचानक एकेदिवशी तो मला भेटला …
आणि त्याची कथा ऐकून मी हैरान झालो…
मध्यंतरीच्या कालात त्याने शिक्षण अर्धवट सोडून मुंबई गाठले …
तिथे गल्ली-बोलातून फिरून त्याने भंगार गोला करण्याचे काम केले…
काही पैसे जमवले आणि पुन्हा तो उभा राहिला…
पुन्हा त्याच्या आयुष्यात संघर्ष आला ॥
त्याने सुरु केलेल्या बिझनेसमध्ये त्यास पुन्हा फटका बसला …
पुन्हा संघर्ष….मात्र तो पुन्हा त्या संघर्षातुनाच
उभा राहिला …


आपण छोट्या –मोठ्या संघर्शाला घाबरतो…
असेच आहे जेंव्हा दुःख येतात तेंव्हा ते गठ्याने येतात….
जेंव्हा दुखः येतात तेंव्हा ते एकामागून एक येतात ….या पासून कुणीही चुकलेला नाही…अनेक मोठी माणसे अश्या संघर्षातुनाच पुढे येतात….जन्मताच तोंडात चांदीचा चमचा आणि डोक्यावर सोन्याचा मुकुट घेवून जन्माला आलेली माणसे या जगत खुप कमी आहेत…संघर्ष हा माणसाचा पाठलाग सोडतच नसेल तर त्यास इतके का घाबरावे ? हा प्रश्न आहे…
तुम्हाला काय वाटते?

कोण मोठा कोण छोटा??

एक दानशूर व्यक्ती होते…
ते दिवसभर दान धर्म करण्यात आपला दिवस घालवत असत…
ते नेहमी आपल्या चार चाकी गाडीत बसन्यापुर्वी स्वताच्या पायातील शूज काढून गाडीत बसत असत…

हा रोजचा कार्यक्रम…
एक दिवस त्याना एकाने विचारले हे असे का करता…??
तेंव्हा त्यानी दिलेले मार्मिक उत्तर ऐकून अनेकांच्या समोर प्रश्न चिन्ह उभा राहिले…
ते म्हणाले माणूस कितीही मोठा झाला तर त्याचे पाय नेहमी जमिनीला टेकलेले असले पाहिजेत ॥
...आणि तापलेल्या जमीनीचे चटके काय असतात याचीही जाणीव दररोज माणसाला झाली पाहिजे…
हे ऐकल्यानंतर एक प्रश्न समोर आला तो म्हणजे कोण मोठा कोण छोटा??

अशी मोठी माणसे होती म्हणूनच हा समाज टिकलेला दिसतो ?
याचा अर्थ ही माणसे नुसतीच मोठी नव्हती ती मोठ्या मनाची सुध्दा होती….
मनाच मोठेपण माणसाच्या आयुष्याला भरपूर मोठ करत…॥
अशी माणसे आता फारशी कुठे दिसत नाहीत...
समाजाला दुशने देत किती दिवस बसायच ....
प्रत्येकान हे काम स्वतापासून सुरु केल तर...
तुम्हाला काय वाटतय???

Sunday, December 14, 2008

टाळ्या ..प्रेक्षक अन कलाकार…

एका थोर अमेरिकन नाट्य कलाकाराची ही कथा आहे…
तो आपल्या प्रत्येक नाटकात एका विशिष्ट दृश्यामध्ये प्रे क्षकाकडून टाळ्या घेत असे …
प्रसंग असा होता…तो स्टेजवर यायचा आणि चहा मागवायचा …
चहा मागवायचा आणि चहापिण्याच टायमिंग तो कधीच चुकू देत नसे…
प्रत्येक शो मध्ये त्या कलाकारच हे नेहमी चालायच…
तो चहा मागवायचा आणि प्यायचा तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवायचे…
एक दिवस त्याने चहा मागवला आणि प्रेक्षकाच्या टाळ्या ची वाट पाहू लागला…
प्रेक्षकाकडून टाळ्या काही आल्या नाहीत॥तो हैरान झाला …
त्याने आपल्या गुरुला हा प्रश्न विचारला ॥
आज माझ्या टाळ्या बंद का झाल्या…गुरु म्हणाले॥
पूर्वी तू चहा मागवायचास आता तू टाळ्या मागवतोस …
पूर्वी प्रमाने तू चहाच मागाव टाळ्याआपोआप येतील …
कलावंत टाळ्याचा भुकेला आहे ...
प्रेक्षकानी त्यास भरभरून प्रतिसाद द्यायचा आसतो…
टाळ्या घेण्याची कसब कलाकाराकडे आसते ...

एक स्माइल प्लीज ….?

जब आपके चेहरे पर
एक हँसी मैंने देखी…
क्या कहू कैसे लगा…
जैसे एक माली ने
खिलता गुलाब देखा….

यहाँ हसना मना है..? अशी पाटी कुठे वाचायला मिळाली तर
तुम्हाला काय वाटेल? हा प्रश्न मी पुणेकराना विचारलेला बरा…
अश्या अनेक पाट्या पुण्यात वाचायला मिळतात ....

हसन्याहून एक गोष्ट माझ्या लक्षात येते ती ही की,काही-काही माणसे हासन्यासाठी कर भरावा लागत असल्यासारखी वागताना दिसतात ....
खरच हसण्यावर कर बसवन्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने
ठरवले तर यांचा कर पूर्ण वाचू शकतो आणि महाराष्ट्र शासनाचे “कर पारितोषीक ”ही त्याना मिळू शकतो…होस्टेलवर असताना माझा एक मित्र रात्रभर जोक्स सांगुन सगल्याना हसवत असे…
शांत रहाणे वेगले आणि न हसने वेगले…
मित्रानो हसा, हुदडा …आयुष्य एकदाच मिलते त्याचा आनंद लुटा…प्रत्येक क्षणाचा आनद घ्या…आयुष्यातील सुख-दुःखाचे क्षण एकमेकाना सांगा …तुमच्या चेहऱ्यावर न सांगताच आनंदाची लहर उठेल….भाई लोग हसते रहो..गुनगुनाते रहो…ये जीवन संगीत है सजाते रहो….

( क्लिक ) एक स्माइल प्लीज ….?

Friday, December 12, 2008

पिढी वाहवत चाललीय…??

नदीला म्हटल
येतेस के जरा ....
चालनेही होईल
तर आलसावत म्हणाली
आता वय झाल

सांधेही दुखतात अधुनमधुन
सोसत नाही सारख
पाण्यात नि पाण्यात....
इथे किती बर वाटत वालूत
निवांत पडून रहायला एका जागी ...

उफाड्याची होते तेंव्हा
तुम्हीच तर म्हनायचा
फार वाहवत चाललीय
एक जागी सापडेल तर शपथ….
मला वाहवत जाण्याचा अर्थ या कवितेत सापडला….
आज सगलीकडे एकच आरोळी ऐकायला मिलतेय नवी पीढी वाहवत चाललीय…
आम्ही यालाच प्रगती असे म्हटले तर…?
राहानिमान बदलले…जगण्याची स्टाइल बदलली याचा अर्थ वाहवत जाने असा नाही.. फ़क्त सुविधा प्रचंड झाल्या म्हणुन ही पीढी वेगवेगळ्या मार्गाने प्रगत होण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे…पूर्वी टी.व्ही . नव्हता .. तमाशापासून सगळी करमणुक असायची …आता सगळे जगच बदलले?त्यामुले पीढी फास्ट झालीय?
तुम्हाला काय
वाटते???

पीढी वाहवत चालली की modernझालीय…?

Thursday, December 11, 2008

ही कसली अग्नी परीक्षा…?????

आयुष्याशी झगड़ताना
मी एकटाच होतो..
वार झेलताना मी एकटाच होतो..
स्मशानात जेंव्हा झगडत होते..
तेंव्हा ही मी एकटाच होतो…

वरील वर्णन मी अनुभवलेल्या एका “अन्त्यसंस्कारातील”आहे..
घटना तशी जुनी..
एका मित्राच्या सासरयाच्या

अन्त्यसंस्काराला मी गेलो होतो…
सगळी मंडळी प्रचंड दुखात असने साहजिक होते….
जेंव्हा अग्नी देण्याची वेळ आली तेंव्हा तिथे झगडे

सुरु झाली


लहान मुलाने अग्नी द्यायचा की मोठ्या मुलाने…
प्रेत सरणावर होते आणि स्मशानात झगडे
सुरु होती ,प्रेताला अग्नी कुणी
द्यायचा या विषयावर…
सगळी मंडळी हैरान झाली …प्रसंग गंभीर होत चालला …
माझ्या मित्राने हस्तक्षेप केला आणि प्रेताला अग्नी देण्याचा कार्यक्रम पार पडला…
माझा मित्र मला म्हणाला …पाहिलास जमाना कसा आहे ते…
अरे या सासरेबूवाना साभालायचे कुणी ?हा प्रश्न या दोघंसमोर होता…
या दोघानी ही त्याना सान्भालाले नाही..शेवटी त्याना
त्यांच्या मुलीने सहारा दिला आणि आज हे सगळे अग्नी देण्यासाठी झगडत आहेत….

या घटने नंतर माझ्यासमोर एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे…
“ …..ही कसली अग्नी परीक्षा..त्यापेक्षा न मेलेले बरे???”

यश ही एक भूक आहे

यश ही एक भूक आहे तर लोकप्रियता हे एक व्यसन….
या दोन्हीची चव ज्याना लागते त्याना ते पुन्हा हव-हवस वाटत …
एक दिवस प्रकाशाचा झोत तुमच्यावरून निघून जातो आणि तुम्ही एकटे उरता…
आज लोकप्रियतेच्या पाठीमागे लागलेली तरुण पीढी जितक्या फास्ट पुढे जात आहे तितक्याच फास्ट खाली येताना दिसत आहे…

कारपोरेट जगतात याचे प्रमाण मोठे आहे…सुरुवातीलाच प्रचंड पैश्याच्या नौकरीत यश संपादन केलेली अनेक तरुण मंडली आज विदेशात या प्रचंड मंदीच्या कालात नैराश्याने ग्रासलेली दिसत आहेत…त्यामुले यशासोबताच अपयशाचीही सवय ज्याना असते ते अश्या वाद्लातुन तावुन-सुलाखून निघू शकतात… मित्रानो ज्ञानबाजी झाली


तुम्हाला काय म्हणायचय ??