निर्मिती ...
संपत्तीच्या समान वाटपापूर्वी ती आधी निर्माण करावी लागते…
निर्मितिकरता स्वतंत्र बुद्धि आणि स्वयंप्रेरणा आवश्यक असते..
गरज हा लायकीचा पर्याय बनला तर समाजातील कार्यक्षमता नष्ट होईलच
पण सर्वात गरजू ,दुर्बल आणि अकार्यक्षम कोण हे सिद्ध करायची चढाओढ लागेल…
आपल्याला काय साधायचे आहे?
भुकेलेली मानवता जगवन्यासाठी तिला अन्न द्यायच?
की सर्वाना अन्न देण्यासाठी मानवतेचा गला घोटायचा ?
निर्मितीची क्षमता असलेली मंडळी या समाजात खुप आहेत मात्र त्याना योग्य व्यासपीठ मिलताना दिसत नाही…अनेकजन पैश्याअभावी तिथपर्यंत पोहचू शकत नाहित…काहीजन सगळी परिस्थिति चांगली असतानाही काही करताना दिसत नाहीत…अन काही काही जनाची लायकी नसताना मोठी झालेली दिसून येतात ती केवळ पैश्याच्या जोरावर…
या जगात लायकी पैश्यावर मोजण्याची रीत सुरु झाल्यामुले हे सगळे घडू लागले आहेत…काही काही माणसे आजही मेहनतीच्या बलावर अनेक चांगली काम करताना दिसतात …गरज आहे म्हणुन त्या कामात झोकुन देणारी माणसेच ही सगळी प्रक्रिया बिघडवताना दिसतात…
निर्मिती झाली तरच नविन काही तरी घडेल मात्र निर्मिती झालीच नाही तर???
तुम्हाला काय वाटते ??
Friday, December 19, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment