Thursday, December 11, 2008

ही कसली अग्नी परीक्षा…?????

आयुष्याशी झगड़ताना
मी एकटाच होतो..
वार झेलताना मी एकटाच होतो..
स्मशानात जेंव्हा झगडत होते..
तेंव्हा ही मी एकटाच होतो…

वरील वर्णन मी अनुभवलेल्या एका “अन्त्यसंस्कारातील”आहे..
घटना तशी जुनी..
एका मित्राच्या सासरयाच्या

अन्त्यसंस्काराला मी गेलो होतो…
सगळी मंडळी प्रचंड दुखात असने साहजिक होते….
जेंव्हा अग्नी देण्याची वेळ आली तेंव्हा तिथे झगडे

सुरु झाली


लहान मुलाने अग्नी द्यायचा की मोठ्या मुलाने…
प्रेत सरणावर होते आणि स्मशानात झगडे
सुरु होती ,प्रेताला अग्नी कुणी
द्यायचा या विषयावर…
सगळी मंडळी हैरान झाली …प्रसंग गंभीर होत चालला …
माझ्या मित्राने हस्तक्षेप केला आणि प्रेताला अग्नी देण्याचा कार्यक्रम पार पडला…
माझा मित्र मला म्हणाला …पाहिलास जमाना कसा आहे ते…
अरे या सासरेबूवाना साभालायचे कुणी ?हा प्रश्न या दोघंसमोर होता…
या दोघानी ही त्याना सान्भालाले नाही..शेवटी त्याना
त्यांच्या मुलीने सहारा दिला आणि आज हे सगळे अग्नी देण्यासाठी झगडत आहेत….

या घटने नंतर माझ्यासमोर एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे…
“ …..ही कसली अग्नी परीक्षा..त्यापेक्षा न मेलेले बरे???”

1 comment:

  1. Doan mulincha baap asane kiti sukhache asate te aaj jaanawale....

    Manoj Tikariya

    ReplyDelete