Friday, December 12, 2008

पिढी वाहवत चाललीय…??

नदीला म्हटल
येतेस के जरा ....
चालनेही होईल
तर आलसावत म्हणाली
आता वय झाल

सांधेही दुखतात अधुनमधुन
सोसत नाही सारख
पाण्यात नि पाण्यात....
इथे किती बर वाटत वालूत
निवांत पडून रहायला एका जागी ...

उफाड्याची होते तेंव्हा
तुम्हीच तर म्हनायचा
फार वाहवत चाललीय
एक जागी सापडेल तर शपथ….
मला वाहवत जाण्याचा अर्थ या कवितेत सापडला….
आज सगलीकडे एकच आरोळी ऐकायला मिलतेय नवी पीढी वाहवत चाललीय…
आम्ही यालाच प्रगती असे म्हटले तर…?
राहानिमान बदलले…जगण्याची स्टाइल बदलली याचा अर्थ वाहवत जाने असा नाही.. फ़क्त सुविधा प्रचंड झाल्या म्हणुन ही पीढी वेगवेगळ्या मार्गाने प्रगत होण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे…पूर्वी टी.व्ही . नव्हता .. तमाशापासून सगळी करमणुक असायची …आता सगळे जगच बदलले?त्यामुले पीढी फास्ट झालीय?
तुम्हाला काय
वाटते???

पीढी वाहवत चालली की modernझालीय…?

No comments:

Post a Comment