Tuesday, December 16, 2008

व्हेन सॉरोज कम , दे कम इन बटालियन्स ..

व्हेन सॉरोज कम , दे कम इन बटालियन्स ..
माझा एक मित्र अनेक संघर्षातुनाच आजही उभा आहे…
तो अत्यंत श्रीमंत होता..
कॉलेजला तो जेंव्हा होता तेंव्हा त्याचा पॉकेट मनी १००० रुपये होता आणि आम्हाला महिन्याला ३०० रुपये
मनीऑर्डर यायची…
त्यांचा तांदलाचा बिझनेस होता॥
पुढे काय झाले माहित नाही..वडिल गावाकडे शेती करू लागले तो गायब झाला…
अचानक एकेदिवशी तो मला भेटला …
आणि त्याची कथा ऐकून मी हैरान झालो…
मध्यंतरीच्या कालात त्याने शिक्षण अर्धवट सोडून मुंबई गाठले …
तिथे गल्ली-बोलातून फिरून त्याने भंगार गोला करण्याचे काम केले…
काही पैसे जमवले आणि पुन्हा तो उभा राहिला…
पुन्हा त्याच्या आयुष्यात संघर्ष आला ॥
त्याने सुरु केलेल्या बिझनेसमध्ये त्यास पुन्हा फटका बसला …
पुन्हा संघर्ष….मात्र तो पुन्हा त्या संघर्षातुनाच
उभा राहिला …


आपण छोट्या –मोठ्या संघर्शाला घाबरतो…
असेच आहे जेंव्हा दुःख येतात तेंव्हा ते गठ्याने येतात….
जेंव्हा दुखः येतात तेंव्हा ते एकामागून एक येतात ….या पासून कुणीही चुकलेला नाही…अनेक मोठी माणसे अश्या संघर्षातुनाच पुढे येतात….जन्मताच तोंडात चांदीचा चमचा आणि डोक्यावर सोन्याचा मुकुट घेवून जन्माला आलेली माणसे या जगत खुप कमी आहेत…संघर्ष हा माणसाचा पाठलाग सोडतच नसेल तर त्यास इतके का घाबरावे ? हा प्रश्न आहे…
तुम्हाला काय वाटते?

No comments:

Post a Comment