हा ग्लास काठोकाठ भरू दया...
वर्षाची सुरुवात आणि शेवट ॥
चांगल्या कामाने होवू दया..
हा ग्लास असाच आयुष्यभर
काठोकाठ भरू दया..
काही क्षण सुखाचे..
काही आतील दुःखाचे ..
दुखाच्या त्या क्षणाना ..
धीराने परतवून लावू या..?
हा ग्लास असाच आयुष्यभर
काठोकाठ भरू दया..
काही प्रेम करणारे..
काही प्रेमाचे नाटक करणारे..
आपल्याही मनातील प्रेम त्याना कलू दया..
हा ग्लास असाच आयुष्यभर
काठोकाठ भरू दया ..।
आपलेच दात आपलेच ओठ
कधी चुकून चावल तर …
त्यानाही कधीतरी
मनातील भावना समजू दया..
हा ग्लास असाच काठोकाठ भरू दया॥
हँपी न्यू इयर ..
चीअर्स ( पूर्ण भरलेल्या ग्लास सह)
Tuesday, December 30, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment